Posts

स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता मा जिजाऊ जयंती निमित्त विन्रम अभिवादन राष्ट्रमाता मा जिजाऊचा जन्मदिनांक: १२ जानेवारी १५९८ ,जन्मस्थान: सिंदखेड राजा (जि. बुलढाणा, महाराष्ट्र) राष्ट्रमाता मा जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राष्ट्रनायक घडवून संस्कारांची महान परंपरा निर्माण केली. मा जिजाऊ जयंती ही मातृत्वाचा गौरव, संस्कारांची ताकद आणि राष्ट्रनिर्मितीतील स्त्रियांचे योगदान अधोरेखित करणारा दिवस आहे. त्या केवळ शिवरायांच्या माता नव्हत्या, तर संपूर्ण राष्ट्राच्या मातेसमान होत्या. राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचे जीवन हे त्याग, धैर्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचे जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या विचारांतून आजही मातृत्व, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते. स्वामी विवेकानंद जन्म १२ जानेवारी १८६३, यांनी तरुणांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्य व राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली, :“उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.”“तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात, तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.” राष्ट्रीय युवक दिन भारत सरकारने १२ जानेवारी १९८४ साली हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून घोषित केला. यामागील उद्देश तरुण पिढीला स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित करणे हा आहे. स्वामी विवेकानंद जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस नसून, आत्मविश्वास, सेवा, राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्ये अंगीकारण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे विचार आजच्या पिढीस मार्गदर्शक ठरतात. स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विन्रम अभिवादन...

Image
  स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता मा जिजाऊ जयंती निमित्त विन्रम अभिवादन  राष्ट्रमाता मा जिजाऊचा जन्मदिनांक: १२ जानेवारी १५९८ ,जन्मस्थान: सिंदखेड राजा (जि. बुलढाणा, महाराष्ट्र) राष्ट्रमाता मा जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राष्ट्रनायक घडवून संस्कारांची महान परंपरा निर्माण केली.   मा जिजाऊ जयंती ही मातृत्वाचा गौरव, संस्कारांची ताकद आणि राष्ट्रनिर्मितीतील स्त्रियांचे योगदान अधोरेखित करणारा दिवस आहे. त्या केवळ शिवरायांच्या माता नव्हत्या, तर संपूर्ण राष्ट्राच्या मातेसमान होत्या. राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचे जीवन हे त्याग, धैर्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचे जिवंत प्रतीक आहे. त्यांच्या विचारांतून आजही मातृत्व, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते.  स्वामी विवेकानंद जन्म १२ जानेवारी १८६३, यांनी तरुणांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्य व राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली, :“उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.”“तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात, तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल.” राष्ट्रीय युवक दिन भारत सरकारने १२ जानेवारी १९८४ साली हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून...

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्– सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवासे हे शेतकरी होते .क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता व परिवर्तनाचा मार्ग दाखवला. अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांप्रमाणे शिक्षण सर्वांसाठी खुले असावे आणि वाचनातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, स्त्रीशिक्षणाचा संदेश पसरवणे आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त

Image
 क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन  

📚 १४–२० नोव्हेंबर : पुस्तक प्रदर्शन .

  📚 १४–२० नोव्हेंबर : पुस्तक प्रदर्शन सप्ताह पुस्तकांच्या सहवासात… ज्ञानाची नवी सुरुवात! ✨ पुस्तक प्रदर्शन म्हणजे पुस्तकांची दुनिया वाचकांसमोर खुली करून दाखविणारा सुंदर सांस्कृतिक उपक्रम.

वाचन दिन

  वाचन प्रेरणा दिन – ज्ञानाकडे नेणारा प्रकाश! 🌟 आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, वाचन ही केवळ सवय नाही, तर आयुष्य घडवणारी शक्ती आहे.पुस्तकांच्या सहवासात आपण विचार करायला, प्रश्न विचारायला, आणि नव्या दृष्टीने जग पाहायला शिकतो. “वाचा, जाणून घ्या, आणि स्वतःला घडवा!” — हेच या दिवसाचं खऱ्या अर्थानं ब्रीदवाक्य आहे. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आणि "मिसाईल मॅन" म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो.